STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

4  

Sushama Gangulwar

Others

लेक

लेक

1 min
652

लाखात एक माझी लेक आहे देखणी 

तिला पाहून चालते रोज माझी लेखणी


लक्ष्मी म्हणून आली माझ्या दारात 

सोन्याच्या पावलांनी हिंडते ती घरात 


माझेच प्रतिबिंब मी तिच्यात पाहते 

तिची नटखट अदा सारखी हसवत राहते 


खाण्यात तिचा रोजच नखरा 

मारावे लागते तिच्या मागे किती चकरा


बापाची तर आहे ती काळजाचा तुकडा 

जास्तच चालतो तिचा बापाजवळ नखरा 


बापावर लेकीची असते अफाट माया 

बापही झिजवतो तिच्या भविष्यासाठी काया 


भावाच्या खोड्या सहज काढते 

शाळेचे कागद त्याची घेऊ घेऊ फाडते 


दिवसभर नको ते उद्योग ती करते 

सारं सामान अख्ख्या घरभर सारते 


करून करून मस्ती थोडीशी दमते 

हळूच येऊन माझ्या मिठीत झोपते 


लेक माझी जवळ खूपच गोड दिसते 

माझा संपूर्ण थकवा मी क्षणातच विसरते 


प्रत्येकाच्या घरात एक लेक असावी 

सुख-समृद्धीने घरं ती भरून दिसावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन