Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anjali Bhalshankar

Action Classics Crime

4  

Anjali Bhalshankar

Action Classics Crime

बाप

बाप

2 mins
230


तू जिवंत असताना तशी तुझी कदरच वाटली नाही

बालपणीचा अल्लडपणा तु वजा होणारच नाहीस कधी हा निरागस विश्वास होता


जरी तु शब्दात फारसा व्यक्त होत नव्हतास

तुझे प्रेम तुझ्या घामाच्या धारेत व अभिमानाने पाहणाऱ्या नजरेत व्यक्त व्हायचे


तू जिवंत होतास तोपर्यंतची तुझ्या

प्रत्येक आकृतीतील माया जपलीय उरात


मान्य आहे तु व्यसनी होतास जरासा

परिवार सांभाळण्याचा सोडला नाहीस वसा


स्वतःला माझ्या शैक्षणिक जीवनातील एक छोटेसे यशही

तुझी छाती अभिमानाने फुलवायला पुरसे असायचे


ते मला तू तुझ्या डोळ्यात दडवलेल्या पाण्यात

कित्येकदा कितीदा तरी दिसायचे


जसे की मन तुझी हरवलेली स्वप्नचं साकारायचे

काही प्रमाणात का होईना तुला तसे वाटायचे


तुझ्या तुटपुंज्या कमाईतही तु किती वाटे करायचास

माझ्या शिक्षणाचा वाटा मोठा बाकी चिडलेल्या आईच्या हाती डोळे मिचकावून ठेवायचा


अर्थपूर्ण आठवा इतिहास लहानपणी शाळा सोडून जावे लागले होते

गुरे वळायला चाकरीला नाहीतर पडली नसती गाठ म्हणालास पोटाची भाकरीला


म्हणून तर बाबा माझ्या शिक्षणाचा पाया मजबूत रुसलास

त्याआधारेच आज अर्थ आला जीवनाला


उतराई थोडेफार तरी होऊ देत होऊ द्यायचं

होतेस कष्टाचे चार घास माझ्याही खायचे होतेस


अवचित निघून गेलास आता ही नजर

भिरभिरते चोहीकडे तुला शोधतेई


 तू नाहीस सोबत हे मी जाणते तरीही

माझे हृदय हे कुठे मानते


शून्यात नजर ठेवून मी सकाळी रडते

वाटते पाठीवर थाप पाठीवर तुझ्या हाताची प्रेमात पडते


मी पुन्हा उभी राहते आठवणीने अभिमानाने तुला आठवते

मी उभी रहाते नव्या दमाने नव्या प्रश्नांना सामोरे जायला ताठ मानेने


एक मात्र जेव्हा मी मरेन नवा जन्म जर खरच असेल

मी तुझीच फक्त तुझीच मुलगी असेल


जन्मजन्मिच्या वाटेवर माझ्या आधी तू उभा रहा माय बाप म्हणून

मला तुझाच आधार सदैवा हवा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action