कुण्या आईची मुलगी
कुण्या आईची मुलगी
आता या मातीची दुर्गंधी
यायला लागली आहे
कुण्या आईची मुलगी
भर चौकात जळायला लागली आहे
आपल्याच गावात आपल्याच शहरात सुखात राहता येईल मनमोकळे फिरता येईल
काय महिलांना एवढेही स्वातंत्र्य नाही का?
किती विटाळलेल्या नजरेपासून स्वतःला वाचवायचं
त्याच्या वासनेचे शिकार व्हायचं
घरात जेव्हा प्रवेश होतो
तेव्हा एक दिवसाने आयुष्य वाढले असते
पण दुसऱ्या दिवशी
घरी परतण्याची शाश्वती नसते
प्रत्येक वळणावर
जगण्या-मरण्याचा खेळ
खेळावा लागतो
नराधमांच्या गर्दीतून
मार्ग काढावा लागतो
<
p>
कोण चांगला कोण वाईट काही कळत नाही
विश्वास ठेवावा असा कोणी भेटत नाही
उगाच छळ होण्यापेक्षा
जन्म न घेतलेलाच बरा
म्हाणायला तर म्हणे
सारे जहांसे अच्छा
हिन्दोस्ता हमारा म्हणतात
आणि तेथेच कितीतरी निष्पाप लेकी बळी जातात
पण या देशात त्या अभागीचा आक्रोश कोणीच एेकत नाही
प्रत्यक्षदर्शी अत्याचार होत असतानाही
कोणी वाचवत नाही
न्यायासाठीही तिला लढावेच लागते
गुन्हेगार पोसले जातात
आणि ती मरत असते
म्हणून आता या मातीची
दुर्गंधी यायला लागली
कुण्या आईची मुलगी
भर चौकात जळायला लागली