STORYMIRROR

Sanjana Kamat

Crime

3  

Sanjana Kamat

Crime

स्वैराचार

स्वैराचार

1 min
232

स्वैराचाराचा राक्षस मोकाट सुटलाय

जळी स्थळी दडी मारून बसलेत

माणसाचे रुप घेऊन नटलेत,

हिस्त्र प्राण्यांचे काळीज घेऊन दडलेत


पाहून स्वैराचारांचे राज्य,

आठवते क्रांतिवीरांचे साम्राज्य

खेळली देशासाठी स्वतःच्या रक्ताची होळी

एकविसाव्या शतकात ही स्वैराचारांची पोळी


इंग्रजांनी केले भारतावर राज्य,

करून अन्याय व अत्याचार

आतड्याला पडतो पीळ आजकालचा,

पाहून स्वैराचार आणि भ्रष्टाचाऱ


जणू ढगफुटीतून प्रत्येक क्रांतिकाऱ्यांचे,

डोळ्यातील ढळढळा आसू वाहतात

त्यांच्या बलिदानाला विसरून स्वैराचाराने,

देशाला फसविणाऱ्यांचे थैमान पाहून रडतात


परप्रांतीयांचा लोढा, पळवणूक स्वकीयांची,

आणा प्रणाली प्रगत देशातील कडक शासनाची,

सोय ती राज्या राज्यात नोकरी, हॅास्पिटलची,

स्वैराचारांस तिथल्या तिथेच ठेचण्याची


वेळ आली त्या स्वैराचाराला दहन करण्याची

वेळ नका देऊ त्यास देश गिळंकृत करण्याची

वचक राहू दे थोडी तरी त्याला या कायद्याची

वेळ ती देशाच्या प्रगतीचा अडथळा दूर करण्याची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime