आई
आई
कसं सांगू आई कसं सांगू तूला
माझा त्याने इज्जतीचा दागिना लुटला
खूप - खूप गं मी त्याला विरोध केला
तिघा तिघांनी पकडून माझ्यावर बलात्कार केला
गिधाडासारखे लोचले माझ्या शरीराला
माझे शरीर चिरले कौमार्य तर विसरूनच गेले
त्याच्या हातापाया पडले त्याने मला रक्तबंबाळ केले
अत्याचाराने मी एवढी ग्रासले रक्ता रक्ताने माखले
आई मी गं हरले गहिवरले अस्ताव्यस्त झाले
काहीच नाही अवसान माझ्यात शिल्लक राहिले
फक्त नि फक्त कलंकित शरीरच माझे उरले
माफ कर आई या शरीराला नाही जपू शकले
मी स्वतःला थोडे सावरले घोट घोट दुःखाचे गिळले
माझ्याच रक्ताने मी माझ्या कलंकालाच पुसून टाकले
पडलेल्या काचेला मी पोटात खुपसून खुपसून घेतले
श्वास संपवायला यशस्वी झाले मी मृत्यूला कवटाळले
मृत्यूच्या कुशीत जाऊन झोपले