STORYMIRROR

Mala Malsamindr

Others

3  

Mala Malsamindr

Others

पाळी

पाळी

1 min
11.5K

घरातली माणसे स्त्रीला का वेगळी ठेवी

का चार दिवस एका कोपऱ्यात जेवण देई

 तिला कशालाच का हात नाहीत लावू देई 

आणि तिला स्वयंपाक नाही करू देई 


तिला देवाच्या देव्हाऱ्याला हात ना लावू देई 

तिच्या हातुन कोणी स्वयंपाक नाही खाई

पाळी तर सगळ्याच स्त्रियांना येत असते 

पाळीमुळे स्त्री-पुरुष जन्मा येत असते 


 पुरुषाचही अस्तित्व पाळीमुळेच असतं

 पाळी मुळेच पुरुषाला पितृत्व प्राप्त होतं 

पाळी मुळेच सर्वच स्त्रियांचे अस्तित्व असते 

 पाळी मुळेच तर उद्याचा वंश वाढतो


 पाळी वर्तमान भूत भविष्य घडत असते 

मग पाळी आल्यावर असा विटाळ का करता 

तुम्ही स्त्रीलाच माता लक्ष्मी दुर्गा मानता

स्त्रियांना देवीच्या मंदिरात नाही जाऊ देता


 पाळीमुळे तर सर्वच जग घडत असते

 पाळीमुळे स्तर सृष्टीचे अस्तित्व टिकते

 तुमच्यामध्ये पाळीविषयी मरगळ का असते 

पाळी नसली तर जन्माचा मार्ग संपतो 


पाळी नसेल तर मग वंशाचा दिवा कुठे जन्मतो 

तुम्हाला सर्व सुख पाळीमुळे मिळते 

मग तुम्हाला त्याचे महत्व का नाही कळते

मग तुम्हाला पाळीचे महत्व का नाही कळते


Rate this content
Log in