STORYMIRROR

Mala Malsamindr

Inspirational

3  

Mala Malsamindr

Inspirational

मी सैनिक झाले तर

मी सैनिक झाले तर

1 min
11.7K

लहानपणापासूनच माझे स्वप्न होते 

मी जीवनात कधीतरी देशाचे सैनिक 

बनावे देशासाठी झीजावे जगावे मरावे 

माझी इच्छा पूर्ण झाली मी सैनिक बनले


लढणार आहे मी बघा सत्यासाठी 

भारत मातेच्याच हो रक्षणासाठी 

बलिदान देऊन मी प्रेरणा बनणार आहे

भारत मातेच्या प्रत्येक लेकरांसाठी


करीन हिमतीने निष्ठुर त्या शत्रूचा अस्त 

त्यांचे आराखडे करून टाकीन उध्वस्त

स्वरक्षण करीन भारताचे जीवनाचा करून अस्तं

भारत मातेला होऊ देणार नाही मी अस्तव्यस्त


करणार नाही मी माझ्या जीवाची पर्वा

वैऱ्याचा करून टाकी मी एका झटक्यात चुरा

ऊंचाविनी मी भारत मातेच्या झेंड्याचा तुरा

मला म्हणतील सर्वजण भारतमातेचा सैनिक खरा


मी गुरफटलो माझ्या भारत मातेच्या बंधनात

तीच्यावर संकट असताना कसा झोपीन मी निवांत

जीकविन भारतमातेला असा आहे मी किर्तीवंत

भारत कालही आजही उद्याही राहणार यशवंत.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational