प्रेम कुणावर करावं
प्रेम कुणावर करावं
प्रेम कुणावर करावे
प्रेम हे सर्वांवरच करावे
आपल्या घरातल्या सर्वच
व्यक्तीवर खुप खुप प्रेम करावे
आपल्या माणसांनी आपल्याला भांडले
तरी त्याच्यावर खूप प्रेम करावे
आपल्या माणसांनी कर्तव्य नाही केले
तरी त्याच्यासाठी आपण कर्तव्य करावे
आपल्या आई, वडील,बहिण, भाऊ
यांच्यावर खुप-खुपच प्रेम करावे
त्यांनी जरी आपल्याला मारले
तरी त्यांचेच पाय धरावे
नवऱ्याने जरी अनादर केला तरी
नवऱ्यावर प्रेम उतू घालावे
त्याचा सन्मान करून खूप - खूप
त्याच्यावर प्रेम करतच रहावे
सख्यासाठी जगावे त्याच्यासाठीच मरावे
इतके.. इतके त्याच्यावर प्रेम करावे
की त्याला आपल्यावर प्रेमच प्रेम
करायलाच भाग पाडावे
त्याचे जरी चुकले तरी सांभाळून घ्यावे
सतत त्याला माफ करतच राहावे
करण त्याला जर शिक्षा मिळाली
तर जास्त दुःख होते आपल्याला
कारण प्रेमाने प्रेम वाढत असते
म्हणून आपली माणसे जोडायचे असते
आपल्या माणसांमध्ये प्रेम वाढवायचे असते
प्रेमाने आपली माणसे जोडायचे असते.
