STORYMIRROR

Mala Malsamindr

Tragedy

3  

Mala Malsamindr

Tragedy

सुरक्षिततेसाठी हत्यार

सुरक्षिततेसाठी हत्यार

1 min
11.3K

आई बाबा तुम्ही मला निडर का नाही बनवलं

नाहीतर मला आईच्या उदरातच मारून का नाही टाकलं 

एवढे मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं 

शिकून-सवरून मला एवढ डॉक्टर बनवलं 

सुरक्षितेसाठी तुम्ही मला एखादं हत्यार का नाही दिलं

शेतात काम करून घाम - गाळून गाळून मला शिकवलं

शिकून-सवरून मला प्राध्यापिका तूम्ही बनवलं 

सुरक्षेसाठी तू मला एखादं हत्यार का नाही दिलं

 तळहाताच्या फोडाप्रमाणे मला जपलं 

ज्ञान शिकवून मला सिस्टर तूम्ही बनवलं 

मग माझ्या सुरक्षेसाठी एखादं हत्यार का नाही मला दिलं

मजुरी करून करून मला तूम्ही शाळेत बाबा पाठवलं

 शिकून-सवरून मोठे बनावं यासाठी शिकवलं 

मग तू मला एखादं सुरक्षिततेसाठी हत्यार का नाही दिलं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy