STORYMIRROR

Mala Malsamindr

Tragedy

3  

Mala Malsamindr

Tragedy

आई

आई

1 min
11.3K

कसं सांगू आई कसं सांगू तूला

माझा त्याने इज्जतीचा दागिना लुटला

 खूप - खूप ग मी त्याला विरोध केला 

तिघा तिघांनी पकडून माझ्यावर बलात्कार केला

 गिधडा सारखे लोचले माझ्या शरीराला 

माझे शरीर चिरले कौमार्य तर विसरूनच गेले

 त्याच्या हातापाया पडले त्याने मला रक्तबंबाळ केले

 अत्याचाराने मी एवढी ग्रासले रक्ता रक्ताने माखले

 आई मी ग हरले गहिवरले अस्तव्यस्त झाले 

काहीच नाही औसान माझ्यात शिल्लक राहिले 

फक्त नि फक्त कलंकित शरीरच माझे उरले 

 माफ कर आई ह्या शरीराला नाही जपू शकले

 मी स्वतःला थोडे सावरले घोट घोट दुःखाचे गिळले 

माझ्याच रक्ताने मी माझ्या कलंकालाच पुसून टाकले

 पडलेल्या काचाला मी पोटात खुपसून खुपसून घेतले 

श्वास संपवायला यशस्वी झाले मी मृत्यूला कवटाळले

 मृत्यूच्या कुशीत जाऊन झोपले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy