पाहुणे
पाहुणे
चुलत बहिणीला बघायला पाहुणे आले
नुकतच होतं तिचं वर्ष सोळाव संपलं
पोरगी लहानच पोरीचं लग्नाचं वय नाही झालं
मझ्या वडिलांनी काकांना खूप समजावलं
काकांनी मुलीचं लग्न करायचंच ठाणलं
मिनलला बघायला बत्तीस वर्षाच पोरग आलं
मीनाच्या डबल वयाचं पोरग बघायला आलं
त्याच्या सोबत घरभर पाव्हन पण आलं
मिनलला तर आता खुप थरथर व्हायला लागलं
काकून तिला साडी घालून साज श्रंगारात नटवल
मिनाच्या हातामध्ये चहा दयायला ट्रे दिले
थरथरत हाताने तिच्या हातातला ट्रे पडले
नंतर मिनलला पाहुण्यांच्या पुढ्यात बसवले
पाहुण्यांनी मीनलला स्वयंपाक येतो का विचारले
मिनलला काहीच येत नसताना होकार दाखवला
मिनलने ताटामध्ये पाहुण्यांना जेवायला वाढले
वाढता वाढता तीने पाण्याचे जग ठोसरले
सगळ्या ताटामध्ये पाणीच झाले
मग पाहुण्यांसाठी आईने परत जेवण बनवले
तरीही सर्व पाहुणे लग्नाला तयार झाले.
तरीही पाहुणे लग्नाला तयार झाले.
