Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Mala Malsamindr

Romance

2  

Mala Malsamindr

Romance

चारोळ्या

चारोळ्या

2 mins
3.4K


1)दिला मजला तू जीवनात सहारा

    दुःखातून सावरले माझ्या मनाला 

    मला माझा मिळाला किनारा

    तुझा स्पर्श आतुरतो मनाला.


2) प्रेमाची चाहूल लागली संथगती 

     जीव तू ओवाळतो माझ्यावरी

     रोम रोम सुखावला प्रेमतरंगावरी 

     तुझे प्रेम लाभावे सर्वोपरी.


3)  तू अशी घट्ट मिठी मजला मारली

     माझी व्याकुळ तहान-भूक मिटली

     ओठावरची माझ्या लाली वाढली 

     अंगावर नवीन कांती चढली.


4) काळोखी रात्र जरी आहे 

     तरी प्रकाश तुझा पडत आहे

     काळोख्या आकाशात बघ

     जिवलगा चंद्र दिसत आहे.


5)  जिवलगा अशी धुंदी मजला आली 

     गुलाबी वाऱ्याची झुळूक स्पर्शली

     तुझी नजर मजला आठवली 

     माझ्या संपूर्ण शरीरावरुन ओघळली.


6)जिवलगा लग्नानंतर 

     मी तुझ्यातच माझा मित्र बघितला 

     तुझ्यातच माझा गुरु बघितला 

     तुझ्यातच माझा पिता बघितला.


7)जिवलगा भांडण काय असते 

     माझ्या मते एकमेकात गुरफटणे

     आर्तत रेशीम धाग्यात विणणे 

     सर्वस्व तूच म्हणून रुसने फुगणे.

 

 8)  सांज वेळेला घरी परतून ये ना

     वेळ का लागतो लवकर ये ना 

     जिवलगा व्याकुळ होत आहे मन

     तुझ्या प्रेमाच्या भुकेने लवकर ये ना.


9)जिवलगा प्रेमाची तुझ्या अबोल 

     चाहूल मजला लागली 

     आणि मी तुझ्याकडे 

     नकळत दृष्टी टाकली.


10)  त्यावेळी होते मी घरी एकटी

     जिवलगा भावना दाटली उरी

     मी फोटोस तुझ्या बघून रडली

     फोटो नि खुलली मनातली कळी.


11)नजर माझी जनू खिळली 

     तुझ्या नजरेच्या तीरावरी

     वाट बघत आहे मी बसुनी वाटेवरी

     लाटांची लहर आली माझ्या अंगावरी.


12)जणू मी हवेत तरंगायला लागली 

     जिवलगाच्या प्रेमात उडायला लागली

     आणि मी माझ्या मनातून हसली

     माझ्या गालावर खळी पडली.


13) मैत्री रुपी तुझ्या मनातले किरण 

     व तुझे प्रेमळ मन मला मिळाले

     दुःखात सुखाची चाहुल लागली

     तुझ्या स्पर्शाने माझी काहिली मिटली.


15) तू जीवनामध्ये पसरवली हिरवळ

     जीवनामध्ये आला असा बहर

     केला कळांनी कुशीतून कहर

  उमटवली अनोमाच्या जन्माने मम्मी अशी मोहर.


16)  तुझे प्रेम म्हणजे नितळ झरा 

     त्यामध्ये माझ्या वेदना वाहून गेल्या

     जखमांवर मलमपट्टी करून गेल्या

     तनमनाला जणू सुखावून गेल्या.


17) तुझ्या रंगांमध्ये चेहरा माझा रंगला

    लाल रंग तू माझ्यावर उधळला

    तुझ्या प्रेमाच्या लालीचा रंग

    माझ्या कपाळावर झळकला.


18) तुला हृदयात बसवते

    जिवलगावर जीव ओवाळते

    मोठ्या आशेने जिवलगा सोबत

    पूर्ण जीवन मी घालवते.


19) सख्या चे शब्द आठवते 

    सख्याच्या नजरेस साठवते

    स्वर्गातली अप्सरा अशी 

    जिवलगानेस्तुती केलेली आठवते .


 20) सख्याचे शब्दांना मानते

    सख्याच्या नजरेस भाळते 

    सख्या जवळ असताना

    जराशी बावरतेRate this content
Log in