सामर्थ्य लेखणीचे
सामर्थ्य लेखणीचे
माझी लेखणी आहे जगात देखणी
सत्यघटना मांडते माझी लेखणी
अत्याचाराच्या व्यथा टिपते
दुःखितांचे दुःख मांडते माझी लेखणी
कर्तृत्व दाखवते माझी लेखणी
ज्ञानाचा प्रसार करते माझी लेखणी
आनंदाचा वर्षाव करते माझी लेखणी
चांगल्या विचारांची जोपासना करते लेखणी
माझी ही कर्तृत्ववान लेखणी देशप्रेम जपते
लेखणी स्त्रीवरील अत्याचाराची मांडणी करते
सर्व जातीयवाद मिटवण्याचा प्रयत्न करते
सर्वजण एक घेणे राहावे यासाठी झिजते
माझी लेखणी दीन दुबळ्या दुःखितांचे
तिमिर जाणते त्यांचे प्रश्न सोडवते
माझी लेखणी गरिबांचे हाल का होतात
गरीब गरीबच का राहतात या प्रश्नांना प्रश्न विचारते
माझी लेखणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सावित्री ज्योतींचे विचार समाजात रुजवते
जे आहे वास्तव जगापुढे आणून दाखवते
सर्वांपुढे सत्य परिस्थिती कथन करते
