परीक्षा घेऊ पाहते ही वेळ.
परीक्षा घेऊ पाहते ही वेळ.
आपल्या क्षणिक सुखांसाठी जाणते-अजाणतेपणी केली,
सारी अविचारांची तू भेळ.
म्हणूनच कधी भूकंप तर कधी चक्रीवादळ
अश्या अनेकांनी घातला आता चांगलाच मेळ.
आत्तापर्यंत कळत-नकळत तुझ्याकडून झालेल्या चुका
आणि निसर्गाशी केलेला तू खेळ.
आता त्याची ही सारी परतफेड,
म्हणून परीक्षा घेऊ पाहते ही वेळ.