STORYMIRROR

Prasad Shelke

Tragedy

4  

Prasad Shelke

Tragedy

तू यावंस..!

तू यावंस..!

1 min
27.7K


आग ओकणाऱ्या सुर्यनारायणाच्या प्रतापानं..

माझ्या नशिबाची माती बेफाम तापलीय..

म्हणून तिला शांत करण्यास..तू यावंस..!


माझ्या अंगावरल्या झळा आसुसलेल्या

ओठांच्या रखरखीत पाकळ्यांनी साद घालताहेत..

त्यांना गुलाबी रंग देण्यास.. तू यावंस..!


उष्ण मनाच्या अखंड वणव्यात भाजलेल्या

अंगाची लाही-लाही आता सहन होत नाहीये..

म्हणून सुखद 'इलाही' बनून.. तू यावंस..!


सागराच्या आभाळात दुधाच्या घागरी भरणाऱ्या..

सह्यकड्यांच्या माथ्यावर वाट पाहत उभी आहे मी..

आता अभिषेक घालण्यास.. तू यावंस..!


मिलनास पुन्हा आता बेचैन जीव झालाय..

तहान ऋतूंची संपवून टाकावी म्हणतेय एकदाची..

म्हणून.. हे मेघमल्हारा, तू यावंस..!


तुझ्यात भिजण्यास..तुझ्यात सजण्यास..

तुझ्यात विरुन जाण्यास..तुझ्यात विसरून जाण्यास..

मी सज्ज आहे ..म्हणूनच

.. हे मेघमल्हारा, तू यावंस..! तू यावंस..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy