STORYMIRROR

Prasad Shelke

Others

3  

Prasad Shelke

Others

उन्हाळपण

उन्हाळपण

1 min
13.6K


सुर्य आग ओकतोय, बाराचा पारा चढतोय..

आकाशातील आगडोंब अंगातून धारा काढतोय.

रस्त्यावर दिसणाऱ्या झळा निर्माण करताहेत..

आभास..नसलेल्या पाण्याचा..!

त्यातच ओसाड रस्त्याकडेला होत राहते गर्दी..

ऊसरसाच्या आणि ताकाच्या गाडीवर..

कृत्रिम थंडाव्यासाठी.

तिकडे मात्र त्याच रस्त्यावर बाजूला एक असतो..

स्थितप्रज्ञासारखा..निर्विकार..

लालबुंद बहरलेला गुलमोहोर !

जणू सुर्याचा लाव्हा भरुन घेतलाय त्याने

'उन्हाळपण' पेलत ..

सावली धरण्यासाठी..

वाटसरुला गारवा देण्यासाठी !

ते वाटतं आणखी एक दुखरं जगणं..

सारी दुःखं हसत पाकळ्यांवर झेलणारं..

परिस्थितीचा वैशाखवणवा पेलणारं..

सोबत्याला हक्काचा आधार देणारं..

जणू अखंड उन्हाळपण झेलत

चटक्यांसवे स्वतःचं सौंदर्य मारून..

मायेचा पदर डोईवर धरुन..

अगदी तुझ्यासारखं !


Rate this content
Log in