STORYMIRROR

Anila Fadnavis

Tragedy Crime

3  

Anila Fadnavis

Tragedy Crime

रंगीत पडद्यावरच्या मुली

रंगीत पडद्यावरच्या मुली

1 min
14.3K


रोज रंगीत पडद्यावर

झगझगत्या प्रकाशात, लग्नाच्या मंडपात गोरटेली मुलगी

बापा पाहुण्यांसमोर लग्न नाकारते

रोज रंगीत पडद्यावर

पटापटा अंथरूणातून उडी मारत मारत सुंदर मुलगी

केस भिरकावीत चमचमत्या ऑफिसात जाते

रोज रंगीत पडद्यावर

आकर्षक चटपटीत कपडे करून मिळवती मुलगी

ऑफिसला जाते कपडे खराब करते

, आई तिच्यापुढे स्वच्छ कपडे ठेवते.

 रोज रंगीत पडद्यावर

गोब-या गालाची छोट्या केसांची लहानगी मुलगी

आई बाबांशी लाडेलाडे बोलये

रोज रंगीत पडद्यावर

गालावरच्या नव्या डागांनी त्रासलेली  तरूण मुलगी

उदास होते, घरी क्रीम लावून चोपडी होते,

हसून मुलामुलीत मिसळते

रोज रंगीत पडद्यावर

कुठून येतात या मुली? कोणते हे आई बाबा?

आज रंगीत पडद्यावर, आमच्याच आम्ही प्रेतकळेच्या मुली,

आमचीच सोशीक मुर्दाड आई अन् मुखस्तंभ नातेवाईक

आमचाच काळ आमचा बाप,

आमच्या नशिबी वाचा फुटलेले पाप

कुठल्या मातीतल्या आम्ही? अन् कसे हे आमचे आई बाप?

आज रंगीत पडद्यावर

कुठल्या मातीतल्या आम्ही? अन् कसले हे आमचे आई बाप?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy