माझी एक मैत्रीण
माझी एक मैत्रीण
मैत्री आणि मैत्रीण याला तोडच नसते
असा अनुभव घ्यायला नशीबच लागते
८६ मधे भेटलो, कामासाठी फक्तं
एकमेकींच्या आम्ही झालो पहा भक्तं
दिवसभर बरोबर, सांभाळत कामाची लय
हळूच उलगडल्या जगण्याच्या लहरी आणि लय
मी शिकले टापटीप, ती शिकली निर्धास्तता
घर आणि ऑफिस यातलं अंतर जोडता तोडता
कधी गंभीर चिंतित चेहरे मूक भाषण करीत
सख्या आणि डब्यासह जाई चिंता विरत
साहेबांचे, घरच्यांचे हुकूम, इतर मैत्रीणींचे वकूब
पेलले, झेलले, झिडकारले कधी गेले सुधारून
आपल्याच फजितीला मानली करमणूक
भेटलो न ठरवता कधीतरी अगदी अचानक
आई वडील बहिणींनी मला आपलंच मानलं
नवरोबांनी दोघींचीही मनं आणि मैत्री उमगून घेतली
मुलांनी या नात्याचं महती जपली
मैत्री आटणार नाही याची जाणीव ठेवली
स्वप्न पाहिली वास्तवात जगलो, गाड्या घेतल्या, घरं घेतली
रोजची भेट थांबली, अजूनच भेटण्याची आस घट्ट झाली
