माझा भारत देश
माझा भारत देश
जेव्हा मी पाहते स्वच्छ सुंदर परदेश
वाटे मला, का माझ्या देशाचा मळकट वेश?
पाहते मी मोकळे निळे आकाश तिथले
दिसते मला इमारतींनी माझे आकाश झाकले.
एकसंधता सार्वत्रिक ही दिसते तेथे
येथ विविधता का माझ्या नयना बोचते?
सोयी, सुविधा सौंदर्याची उधळण रे तेथे
सुंदरता अन् भव्य दिव्यता देवालयी वसे इथे.
अति लोकसंख्या अन् संधीसाधू नेते असताना
कशी लागावी शिस्त नेटकी माझ्या देशाला?
