STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Crime

4  

Sanjay Dhangawhal

Crime

तिला फक्त जळायचं असतं

तिला फक्त जळायचं असतं

1 min
398

बलात्कार म्हणजे

तिला काय माहीत

तिला फक्त जळायचं असतं

निषेध करुन वितळायचं असतं


असा किती आक्रोश झाला

आणि कितीदा निषेध केला

लाख जळाल्या असतील मेणबत्त्या

खरंच का कोणाला न्याय मिळाला?


अत्याचाराचा घाव करूनही देह जाळला जातो

न्यायासाठी उगाच त्या मेणबत्तीवर अन्याय होतो

नकळत अशा कितीतरी मेणबत्त्या 

रोज जळत असतात

वासनेच्या अग्नीत वितळत असतात


त्या न्याय कक्षेत डोळ्यावर पट्टी बांधून

उभी केलेल्या मुर्तीलाही

न्याय अन्यायाचा तराजू आता तिला पेलवत नाही

फक्त निषेधाची मेणबत्ती पेटवून 

दिलेली श्रद्धांजली

तिलाही सहन होत नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime