STORYMIRROR

Mala Malsamindr

Crime Others

4  

Mala Malsamindr

Crime Others

अस्तित्व तिचं

अस्तित्व तिचं

1 min
298

काळोखात लिहिते मी एका काळोखाची कथा

घडतात तिथे किती तिच्या अब्रुचा व्यथा

ओरबडून काढला जणू तिच्या काळजाचा जत्था

लुटून टाकली तिची सर्वच मालमत्ता 


कोणाला कशी सांगेल अन्तर्मनाची व्यथा

बापानेच खाल्ल्या होत्या तिच्यासाठी खूप खस्ता 

तोडला तिच्या बापानेच तिच्या अंगाचा लचका

तिला किती बसला बघा मनातूनच वचका 


संपलं सोळावं तिचं बापानंच केलं शोषण तिचं

दारूच्या नशेत चुरगाळून टाकलं कौमार्य तिचं

जागृत कशा होतील तिच्यात नव्या चेतना

जगावं कसं जगात त्या चिमुकलीने बापाविना

जाळून घेतलं संपवून टाकलं मग अस्तित्व तिचं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime