STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Crime

3  

अमोल धों सुर्यवंशी

Crime

सुरक्षित कुठे आहेत मुले?

सुरक्षित कुठे आहेत मुले?

2 mins
341

वाचकांना वाटेल मी काहीही लिहितोय.

नाही हो मायबाप, मी सत्य पेरतोय...

बलात्काऱ्यासाठी कायदा आजून कडक करा.

मुलींच्या रक्षणासाठी दोषींना बेदम मारा.

कायद्यापुढे सर्वं सारखे ना? पळून गेले दोघे,

तर दोघांना पण सजा एक करा...

दोष तूला लावू कसा?..

तू दोषी बनवून निघून गेलीस.

पहिलं,पहिलं प्रेम म्हणून, काळजाला तडफवून गेलीस...

घट मिठीत घेऊन बोली होतीस 

सोन्या पळून जाऊ,.

 तू तुझा घरी आहेस. मी जेल मधी राहू.?

तुझ वय कमी आहे बाई तू घरी जा पायापाडतो,

तू तेव्हा नाही ऐकलीस....

तुझा मतांवर अडून बसलीस..

काय सांगू तुझे खोटे वादे.

घरी गेलो तर पुन्हा नाही भेटणर.

आयुष्य भर मी तुझी साथ नाही सोडणार.

अग फक्त सहा महिने थांब ना,

निघून जा तुझा घरी.

खेळ नाही संसार करायचा आहे,

कुठे घेऊन फिरू, तूला दारोदारी.

अडकवायचं होत म्हणून नाही गेलीस माघारी.

सोडावं हिला जावं हिथून,

मी पाप करतोय माहित होत.

कस सोडनार माझं मन मला,

आतल्या आत खात होत.

निश्चिय केला जाऊ घेऊन हिला मेलो तर प्रेमासाठी.

,देवनाचं बांधल्या असतील साता जन्माच्या गाठी.

जेव्हा तुझा आईबाबांचा फोन आला

तेव्हा तू सिम ठेवून मोबाईल फेकून दिला..

समजलं नाही तेव्हा,तुझा या खोट्या प्रेमाने डोळ्यावर रुमाल ठेवला.

सात जन्म सोबत राहू,शपथ घेतलीस.

 सतव्या दिवशी तू सोडून निघून गेलीस.

ज्या आई बाबांची तू विरोधी होतीस

 त्याची आता सखी झालीस.

सोबत राहण्याची हमी देऊन,

कशी पक्की बेवफा निघालीस.

सोन्या पळून जाऊ,.

 तू तुझा घरी आहेस. मी का जेल मधी राहू.?

प्रेमाला बदनाम करून केसाने गळा कापलास.

सगळयांनी साथ सोडली,

 "हेरिंगला जज बोलतो"

कोण आलंय का तुझं.

रात्रीचा पोलीस मला दांडकणे फोडतो..

जेलच्या भिंतीकडे बघून खूप, खूप मी रडतो..

सकाळ झाली की वाट बघत असतो कोणी येईल.

सोडून मला घेऊन जाईल..

या यातना सहन करतोय, तरीही कस काय?प्रेम करतोय.

तू पळत यावं या पिजऱ्याचा दरवाज्या खोलावा

हिथे माझा दम घुटतोय...

डोळे बोलतात बस आता अश्रू उरले नाहीत.

कस सांगून?या डोळयांतून मनात उतरल्याली,

आता डोळ्यांना खपेना...

मला पाहिल्यावर ती हसल्याशिवाय राहीना.

वाचकांना वाटेल काहीही लिहितोय.

नाही हो मायबाप, मी सत्य पेरतोय.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime