वादळ
वादळ
थोडा वेळ थांब!!!
वाईटाच्या बुडावर लातच मारतो,
धुरा सकट त्याची आगच काढतो.
ही जळती दुनिया,
आयुष्याचा वणव्यात उभा पेटल्यावर,
खरी कळती दुनिया.
अपयशा सोबत पराजयला,पण
जिवंत उभा मातीत गाढतो.
वाईटाच्या बुडावर लातच मारतो,
धुरा सकट त्याची आगच काढतो.
माझी रांगडी ढेखाळ, चाल.
गड्या ठेचगणितं मी तांडव माडतो.
मग परिचितसाठी पण अपरिचित बनतो
मनाचा राक्षस नागडा राशीवर थैमान घालतो.
वाईटाच्या बुडावर लातच मारतो,
धुरा सकट त्यांची मी आगच काढतो.
गुलामाची वास्ता आता करायची नाय.
यांचे तिघडे डाव पेज यांचे बिघडू खेळी
बादशहा वर जशी राणी वेडी.
एक राजा यांचे शंभर बीरबल.
माझा एक कृष्ण यांच्या लाखा बरबर.
दूर केलं तेंव्हा नाही विचारली मर्जी.
संकटात कल्टी यांची मयतावर गर्दी...
वाईटाच्या बुडावर लातच मारतो,
धुरासकट त्यांची मी आगच काढतो.
