STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy Thriller

4  

Ashok Shivram Veer

Tragedy Thriller

जीवन म्हणजे...

जीवन म्हणजे...

1 min
281

हे जीवन म्हणजे रहस्यमय भयकथा,

कोण ऐकेल का हो आपली ही व्यथा.


रात्रंदिन पाठलाग तो भयाण यमाचा,

नाही राहिला भरवसा कसा कोणाचा.


उजेडातही काजवे ही कशी चमचमती,

अंधाऱ्या रात्री रातकिडेही भय दाखवती.

 

कसे फाटती पडदे हे या नाजूक कानांचे,

ऐकूनी कर्कश आवाज त्या रानटी श्वानांचे.


घेता आसरा त्या झाडाझुडपांचा,

फडफडाट ऐकू येई या घुबडांचा.


पडता कानी फुस्कार ती नागाची,

वळते बोबडी येथे आपुल्या साऱ्यांची.


स्मशानातूनही पेटती लालबुंद मशाली,

कोण करील का हो या देहाची रखवाली.


हे जीवन म्हणजे रहस्यमय भयकथा,

ना तुमची ना माझी ही तर साऱ्यांचीच व्यथा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy