नेता...
नेता...
सारेच राजकारणी करतात
जनतेची दिशाभूल,
निवडणूका पार पडताच
होतात सारेच गुल.
दिलेल्या आश्वासनांचा
पडू लागतो त्यांना विसर,
लाल दिव्याच्या गाडीतून
जनता दिसू लागते धूसर.
भिंतीवर लागल्या गोळ्या
तरी त्याला मिळतो न्याय,
गरीब जीवानीशी जातो
तरी त्याला काहीच नाय.
माणूस निरडावला हा
इतका असा कसा,
स्वतःचे नातलगही
विसरून चालला जसा.
एक दिवस अद्दल घडविल
तुला हीच सारी जनता,
अस्तित्वही उरणार नाही
तुझे तू होतास कोणता नेता.
