विठूराया...
विठूराया...
विटेवरी उभा माझा विठुराया,
वाटे जशी त्याची कोळशाची काया.
बाधूनीया गळा तुळशीची माळ,
घेऊनीया हाती मृदुंग आणि टाळ.
घेऊनीया हाती मृदुंग आणि टाळ.
भाळी शोभतो टिळा हा चंदनाचा,
मुखी तो गजर हरिनामाचा.
साधू संतांना करुनीया गोळा,
लावितसे तो भक्तांनाही लळा.
लावितसे तो भक्तांनाही लळा.
दळण दळीतो जनाईच्या घरी,
चिखलही तुडवितो कुंभाराच्या दारी.
विठूराया असे ती जगाची माऊली,
अनवाणी भक्तांची होतसे सावली.
अनवाणी भक्तांची होतसे सावली.
