मी मी आणि मी...
मी मी आणि मी...
मी मी आणि मी...
मी म्हणजे माझं मलाच माझ्यासाठी,
सारं काही आपल्याच स्वार्थासाठी.
मला ना काही देण घेण या जगाचं,
खरं तर एकमेव ध्येय माझं जगायचं.
खरं ना काही सारंच असतं खोटं,
येथे तर फक्त नाव मोठं लक्षण खोटं.
जळला सुंभ तरी पीळ असतो कायमचा,
मी पणाने उरत नाही कोणी कोणाचा.
संपत जरी आलं आपलं आयुष्य,
तरीही बघत बसायचं उद्याचं भविष्य.
