खरं सरण स्वप्नातलं मरण...
खरं सरण स्वप्नातलं मरण...
खरं सरण स्वप्नातलं मरण...
मेल्यावर म्हातारी जाता जाता म्हसणात,
तिरडीवरुन उतरुन चालू लागली स्वप्नात.
आयुष्यभर दुसऱ्यांसाठी खाल्ल्या खस्ता,
आता दिसाय लागला स्मशानाचा रस्ता.
दिसताच समोर रचलेलं सरण,
आठवलं तीला स्वत:चंच मरण.
पळ काढायचा तीनं मनोमन ठरवलं,
पण तीला उचलून सरणावर ठेवलं.
परतीचे दोर ही आता सारेच कापले,
पेटविण्यास चिता काहीजण तापले.
आधार घेऊनी तो घासलेटचा,
दिला उडवून भडका हा आगीचा.
ओरडून ओरडून तिनं कांगावा केला,
तोवर गाव सारा परतून ही गेला.
