Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kishor Gaikwad

Comedy Romance

3  

Kishor Gaikwad

Comedy Romance

तिच्या आठवणींत रमत असतात सारे

तिच्या आठवणींत रमत असतात सारे

1 min
402


गोड गुलाबी स्वप्न पाहत असतात सारे 

तिच्या आठवणींत रमत असतात सारे  


कॉलेज असो कॅन्टीन असो क्लास रूम असो

तिच्याशी बोलण्याचा बहाणा शोधत असतात सारे 


तिचा नंबर मिळवता मिळवता वाईट हालत होते यांची 

तरी जेवलीस का प्रेमानं विचारत असतात बिचारे 


तिची नजर दुसऱ्या कोणालाही शोधू दे

यांची नजर तिच्यावरच खिळत असती हे मात्र असते खरे


एकदा ती हो म्हणू दे..! हा डायलॉग फिक्स 

तिच्यासाठी मोठा मेसेज रेटून आलेले असतात बिचारे


तिच्या आवडीनिवडी तिचा अॅड्रेस सगळं शोधण्यात 

यांना मदत करत असतात यांचे मित्र ते खरे 


शेवटी ती भेटत मात्र नाही कॉलेजचे दिवस मात्र संपतात

आणि आठवणी घेऊन निघत असतो आपण सारे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy