STORYMIRROR

Kishor Gaikwad

Abstract

2  

Kishor Gaikwad

Abstract

सखे एकदा तरी माझी साद ऐकशील का ?

सखे एकदा तरी माझी साद ऐकशील का ?

1 min
3.2K


सखे एकदा तरी माझी साद ऐकशील का?

दोन मिनिट माझ्याशी निदान बोलशील का?

नजरेस तिरकसपणा असा बरा नाही

तुजविना चेहरा माझा हसरा नाही

ओठी तुझ्या गीत माझे गाशील का?

सखे एकदा तरी माझी साद ऐकशील का?

घोर असा मनाला लागलाय

चटका तुझा या ह्रुदयाला लागलाय

माझ्यासाठी वेळ काढशील का?

सखे एकदा तरी माझी साद ऐकशील का?

विरह हा तुजवीन सहन होईना

दिवस पुरता पुरता सरेना

कधी माझ्यासाठी प्रार्थना करशील का?

सखे एकदा तरी माझी साद ऐकशील का?

कितीदा तुला सारखे सारखे आठवावे

मनी पूरे साठवून ठेवावे

तूही मजला आठवून मनी साठवशील का?

सखे एकदा तरी माझी साद ऐकशील का?

दुरुनच पाहू कितीदा तुझ्या चेहऱ्यावरच हसणं

ते तुझ्या गालावरच गालात, गोड गोड लाजण  

तूही एकदा मला पाहशिल का?

सखे एकदा तरी माझी साद ऐकशील का?

सखे एकदा तरी माझी साद ऐकशील का ?

दोन मिनिट माझ्याशी निदान बोलशील का ?

 

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract