STORYMIRROR

Kishor Gaikwad

Others

4  

Kishor Gaikwad

Others

आमचं राजं

आमचं राजं

1 min
187

थोडंसं मनातलं...

राजं त्रिवार मानाचा मुजरा...

राजं तुमच्या पराक्रमाच्या कहाण्या आजही 

ऐकताना अंगावर शहारे

आल्याशिवाय राहत नाही,

इतिहासदेखील आभाळाएवढ्या तुमच्या कर्तृत्वाला 

झुकून सलाम केल्याशिवाय राहत नाही,


तुमच्याशिवाय सह्याद्रीच्या नद्यासुद्धा 

दऱ्या-खोऱ्यामधून, पानाफुलामधून वाहत नाही,

तुमच्याशिवाय सगळं अधुरं आहे राजं,

मराठी माणसाचं अस्तित्व,

मराठी माणसाचा स्वाभिमान,

मराठी माणसाचा अभिमान,

मराठी माणसाचा पराक्रम,

मराठी माणसाचा बाणा,


राजं तुम्ही अन्यायाविरुद्ध लढण्याची 

आम्हा सगळ्यांत उर्मी निर्माण केली 

तुम्ही विश्वासाची भावना, एकोप्याची भावना जागवली

तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन शत्रूविरूद्ध लढण्याची शक्ती आम्हास दाखवून दिली

मनगटात ताकद आणि

स्वतःवर विश्वास असेल तर 

कुठलंही आव्हान लिलया पार करू 

शकता हे तुमच्या युद्धनीतिवरून साफ दिसून येतं


अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापन करण्याची घेतलेली प्रतिज्ञा आजही आम्हाला स्फुर्ती देते

तुमच्याविषयी मावळ्यांमध्ये असलेली निष्ठा, आदर हा विश्वासाचं प्रतीक म्हणून आम्हाला वेळोवेळी शिकवण देत असते...


Rate this content
Log in