STORYMIRROR

Kishor Gaikwad

Romance

3  

Kishor Gaikwad

Romance

पावसातील भेट तुझी माझी

पावसातील भेट तुझी माझी

1 min
28.7K


अंगावर पावसाच्या

धारा घेवून

चिंब भिजतच

होतो आपण

बेधुंद होऊन

मिठीतच होतो आपण

बेफिकिरपणे

एकमेकांच्या डोळ्यांत

निरागसपणे

पहातच होतो आपण

भावी आयुष्याचे

स्वप्न रंगवत होतो आपण

विश्वासाचे नाते

जगत होतो आपण

हवेत गारवा असूनही

जाणवत नव्हता

कारण उबदार जगात

जगत होतो आपण

कधी पाऊस संपला

कळलेच नाही

सोबतीच्या क्षण तुझे कधी

 विरघळले कळलेच नाही

कधी माझे आयुष्य तुझ्यात

जगत होतो समजलेच नाही

आपल्या दोघांच्या सोबतीचा

हा पाऊस साक्षीदार

आणि  सप्तरंगातून सांगतोय

तूच हिचा खरा जोडीदार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance