STORYMIRROR

Kishor Gaikwad

Romance

3  

Kishor Gaikwad

Romance

उगाच....!

उगाच....!

1 min
89

उगाच तडफडतो का जीव कुणासाठी,

उगाच कासावीस होत का काळीज 

त्या आठवणींना आठवल्यावर,

उगाच हात थरथरतो का 

त्या भेटवस्तू वरून बोटं फिरवताना,

उगाच धडधड होते का 

ते एक नाव ऐकल्यावर,

उगाच मन बेचैन होत का..?

उगाच रात्रंदिवस झोप लागत नाही का .?

उगाच एकट मन खायला उठतं का..?

उगाच बेभान वाऱ्या सारख सुटत का. ?

आपल्याच विश्वात

सगळंच उगाच असतं तर 

कुणी कुणासाठी थांबलं नसतं 

ह्या धावपळीच्या जगात,

क्षणात नात बदलू पाहणाऱ्या युगात 

त्या वाटेवर चातकासारख वाट पाहताना 

कुणीच दिसलं नसतं

आज ना उद्या येईल 

नजरानजर होईल

म्हणून ह्या बोथट झालेल्या 

नात्यासाठी डोळ्यातून थेंब काढताना 

कुणीच दिसलं नसतं,

कुणीच थांबलं नसतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance