तिची आठवण
तिची आठवण
तिची अशी काही एका
क्षणाला आठवण यावी.
हळूच वाऱ्याने चेहऱ्यावरची
स्माईल चोरून न्यावी.
सार काही विसरून गोड
क्षणांनी मी खुलून जावं.
आठवणींच्या पालापाचोळ्यावर
मी अलगद डोकं टेकाव.
तिच्या नजरेला पाहण्याचं
वेड अंगात भुर्रकन शिरावं.
पण या वेड्या मनाला मी
आतल्या आत घुसमटून धराव.
तेवढ्यात या रंग बदलणाऱ्या
निसर्गाला ही लहर यावी .
हलक्या थेंबानी मला
तिच्या नाजूक स्पर्शाची ऊब द्यावी.
तरळतील अश्रू मी
रडलेला असेल हे समजताना
पाहत असेल मी
या निसर्गाला ही बदलताना....!

