कधी उगाच वाटतं
कधी उगाच वाटतं
कधी उगाच वाटतं बसावं समुद्र किनाऱ्यावर
झुलाव वाऱ्याच्या हिंदोळ्यावर मस्त सनसेट पाहत
कधी उगाच वाटतं जाऊन विचारावं त्या पावसाला
बाबा आता तरी थोडी उसंत घेतोस का रे..?
कधी उगाच वाटतं ढगांच्या आड लपलेलं
डोळे उघडे ठेवून नवं जग अनुभवायला भेटावं
कधी उगाच वाटतं इंद्रधनुष्याला शोधावं
एवढे रंग कुठून एकत्र आणतोस, कसे आणतोस
कधी उगाच वाटतं गुलाबाला जाऊन विचारावं
तुला तुझेच काटे कधी टोचले का रे ..?
