STORYMIRROR

Neha Ranalkar

Comedy Others

5.0  

Neha Ranalkar

Comedy Others

विषय: विहीणबाई

विषय: विहीणबाई

1 min
4.3K


विहिणबाई तुमची काय

सांगू माय कथा|

सामान तुमनं पसरलं शे

आथा नि तथा||१


तुमच्या पोराकंड पाहून

दिली आमची मुलगी|

त्यांच्या शिवाय कुणाचिही

पिटणार नाही मी ढोलगी||२


आमच्या साठी फक्त 

आमचा जावईच एकमेव|

इतरांना हो आमच्या घरी

कशाला हवी नस्ता उठाठेव||३


आमची लेक तर आहे

लाखाच एक हो देखणी|

तिला फक्त चालवता येते

कंप्युटर आणि लेखणी||४


स्वयंपाक घरात तिला

समजून घ्या हो जरा|

तिला आत्ता कुठ़ मी

शिकवला आहे शिरा||५


तिच्या मेकअपला नावं

ठेऊ नका हो मूळीच|

तिच्या पुढे इतर सारी

मला वाटतात खूळीच||६


सध्या तरी ती दिसतेय

मला वरवर जरी शांत|

उगाच काढू नका कुरापत

नाहीतर करेल ती आकांत||७



Rate this content
Log in