STORYMIRROR

siddheshwar patankar

Comedy

4  

siddheshwar patankar

Comedy

स्वप्नात एकदा चार सिंह मारले

स्वप्नात एकदा चार सिंह मारले

1 min
2.0K

स्वप्नात एकदा चार सिंह मारले

अरे लेकांनो मारले कसले


चांगले उभे आडवे हाणले

पुढे गेलो तर काय?


जंगली हत्तींचा कळप चालून आला

बाह्या सरसावून ठोकून काढला एकेकाला


भिरकावून दिले गगनात एकेक करुनि सारे

अजुनी आहेत ते बनुनी गगनी तारे


याच ताऱ्यांचे पाठ गिरविता

तुम्हासी न ठावे असे मीच करविता


मखलाशी चालू असे मनाशी

बहुत लढे उशी घेऊन उशाशी


लढतालढता पाय पसारे

बायको उठुनी झाडू मारे


स्वप्न मोडिता सत्य अवतरे

मारलीस का कधी खरी कबुतरे?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy