STORYMIRROR

siddheshwar patankar

Others

3  

siddheshwar patankar

Others

लग्नाआधीची लिटमसची चाचणी

लग्नाआधीची लिटमसची चाचणी

1 min
281

लग्नाआधी लिटमसची चाचणी करून घ्यावी


निर्व्यसनी असाल तर नको नको ती सवय लावून घ्यावी


कधी तंबाखू चोळावा निवांत तर कधी दारू ढोसावी


जर सर्व ठीक आले, तरच बायको करावी


अन्यथा बोहल्यावर चढू नये


चढल्यावर तोंडावर पडू नये


यातून अखेरपर्यंत सुटका नाही


हेच सत्य मानून, खालील पद्धत अवलंबावी


व्यसनांनुसार टाकावा एकेक थेंब लाळेचा


हातातल्या लिटमस कागदावरी


बघावे सामूचे मोजमाप नीट


बायको येण्यापूर्वी घरी


जर सामू आला सात


खुशाल आपली काढावी वरात


जर त्यामध्ये असेल चढउतार


थेट घ्यावी माघार, लग्नकार्यातुनी


सवयीनुसार सामूची वर्गवारी


तंबाखू असे तीनवरी


सुपारीसहित तोच बसे पाचावरी


सोडामिश्रित आठवरी तर


ऑन दि रॉक्स ती दहावरी


देशीसाठी नसे चाचणी


कारण देशी असे जनावरी


लक्षात ठेवा नवरोबांनो


अर्धांगिनी पण लिटमस परी


सुटणार नाहीत नाद कुणाचे


मग असाल तुम्ही रडारवरी


व्यर्थ नका मरू दादा


घ्या आधी लिटमस पेपर साधा


व्यसनांती पण सामू सात असेल


तरच निवडा आपली राधा


जर हे सर्व व्यवस्थित असेल


तर आणि तरच बोहल्यावर चढा


नाहीतर रामदास स्वामींप्रमाणे


सावधान ऐकताक्षणी सरळ मंडपाबाहेर पडा


Rate this content
Log in