STORYMIRROR

siddheshwar patankar

Comedy

4  

siddheshwar patankar

Comedy

भादरायला हवे वाढलेले

भादरायला हवे वाढलेले

1 min
407

भादरायला हवे वाढलेले, भादरायला गेलो 

न्हावी होता बिझी म्हणून पेपर वाचू लागलो 


पेपर वाचता वाचता एक जाहिरात बघितली 

होती तशी छोटी पण लक्षात बाकी राहिली


नंबर आला जवळ म्हणून पेपर घेतला छाटून

न्हावी होता मग्न कामात , दिला खिशात ढकलून 


भादरवुन थेट घरी मी अंघोळीला गेलो 

जाहिरात तशीच खिशात पडून , विजार मागे सोडून आलो 


दुसऱ्या दिवशी आरोळीने जाग मला आली 

मला वाटलं मनातल्या मनात, आमची हि खपली 


उभा राहिलो बघण्यासाठी, बघतो तर हे काय 

जाहिरातीचे पान हाती घेऊन डोके पिटत होती हि बाय 


सांगून सांगून थकलो तिला हरलो सारे उपाय 

अक्कल सारी गुडघ्यात यांची, दुसरं करणार तरी काय ?


लंपट समजून मला तिने, मुलं वेगळी केली 

फोन लावूनी सार्यांना, कपाळात आणल्या भाय 


जाहिरातीचे पान थेट समाजात उभे केले 

आईबापासंगे सारे सोयरेपण आले 


मुलगा माझा नाही त्यातला, सांगत होती आई 

सासूसासरे बोंबलत होते लंपट निघाला ओ जावई


सांगून सांगून थकलो तरी ऐकत नव्हते कुणीच 

हळूहळू आईही माझी समजू लागली मला नीच 


मोर्चा वळवला सलूनमध्ये, जमले तेथे सारे 

न्हावीही ते कळताक्षणी बोंबाबोंब सुरु करे


झक मारली नि भादरावयाला या सलूनमध्ये आलो 

जाहिरात राहिली बाजूला, पण लंपट मात्र झालो   


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy