Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

siddheshwar patankar

Others

3  

siddheshwar patankar

Others

एक ओझं, माझं की तुझं?

एक ओझं, माझं की तुझं?

1 min
331


आज थोडं थकल्यासारखं वाटतंय 

एक ओझं, माझं की तुझं?


ते तो वरचाच जाणे 

माझ्याच खांद्यावर आल्यासारखं वाटतंय 

ते पाप होतं कि पुण्य होतं 

तेपण तोच जाणे 

पण त्या श्रापांच्या दग्ध अग्नीत 

मलाच जळाल्यासारखं वाटतंय 


बोलतोय मी, पाहतोय मी 

आजूबाजूला घडणारे सारे 

ओळखतोय मी ते बदल कालानुरूप होणारे 

करतोय मीमांसा मी माझ्याच अस्तित्वाची 

बोट दाखवूनही पलीकडं, 

सारं माझ्याकडेच आल्यासारखं वाटतंय 


मी थकलोय, तरीही उठतो अन अखंड शोधतो मलाच स्वतःला 

शोध घेऊनही सापडत नाही 

आत खोलवर कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय 

आठवणींची मशाल पेटवूनही काहीच आठवत नाही 

वणव्यात सारं काही जळाल्यासारखं वाटतंय 


फक्त हे शरीर उभे नावाला 

बाकी सारं काही संपल्यासारखं वाटतंय 

आज थोडं थकल्यासारखं वाटतंय


Rate this content
Log in