STORYMIRROR

siddheshwar patankar

Others

3  

siddheshwar patankar

Others

कांताला सुरु झाल्या वांत्या

कांताला सुरु झाल्या वांत्या

1 min
273

कांताला सुरु झाल्या वांत्या 

नाव आलं पुढे लगेच अंत्या 

अंत्या बोल्ला तो मी नव्हेच 

असेल तो शेजारचा बंट्या 

त्यालाच बघितलं व्हतं 

शेतात गप्पा मारताना 

परत आलो जाऊन तेव्हा बघीतलं 

झुडुपात कोणीतरी हलताना 

धरून आणला बंटी मंग 

आवळली त्याची खुंटी 

बंट्या बोलला मी तर बाबा 

शेतात खपत होतो 

खिल्लारी जोडी झुडुपामागं

त्यांनाच जोडत होतो 

आईची आन, मी नाही केली घाण 

शपथेवरती सांगतो 

पकडा जाऊन राजुला 

तोच कांतावर झुरतो

कांता करतेय वांत्या 

तिला बघतं नव्हतं कोणी 

जो तो आपला विचार करतोय 

कोण असेल हिचा शिरोमणी ?

वांत्या करुनि अर्धी झाली 

तरी तिला कुणीच बघत नव्हते 

इतक्यात अचानक अवतरले तेथे 

जे शाळेचे शिक्षक होते 

बघुनी गर्दी माग काढता 

समजून आला प्रकार 

खडसावून सांगू लागले सर्वांसी 

असेल पोटाचा विकार 

तुरंत बोलावूनि डॉक्टरला 

केली तिची समीक्षा 

डॉक्टरने मग तपासून नीट 

कळवली पोटाची वाईट दिशा

गावकरी सारे ओशाळले 

कळले शिक्षणाचे मर्म 

मेंदू तेव्हाच चालतो योग्य 

जेव्हा शिक्षण होईल धर्म .... 



Rate this content
Log in