Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

siddheshwar patankar

Thriller

3  

siddheshwar patankar

Thriller

लढली अशी की झुंजीतच वाढली

लढली अशी की झुंजीतच वाढली

1 min
449


तृण वेचून खोपा बांधला


वर्तीकेने इवलासा संसार थाटला


शस्य शोधावया नर भ्रमणास जाई


जननी आगंतुकांच्या सोहळ्याची वाट पाही


कालानुपरत्वे सोहळे झाले


खोप्यामध्ये इवलेसे जीव आले


किलबिलाट उपवनी माजे


काकांची मत्सरी ईर्ष्या जागे


चिऊ सज्ज रक्षणास ठाकली


झुंज नाही सोडली


लढली अशी की ती जणू झुंजीतच वाढली


निष्ठुर काक नि ती इवलीशी पिल्ले


घरट्यावर त्यांनी सुरु केले ते हल्ले


जननी उभी सरसावुनी चोच,


चोचीला अशी काही धार जी चढली


पडली धडपडली पण लढली अशी की


काकांवर जणू विद्युल्लता कडाडली


पिल्लांच्या रक्षणास चिऊ सरसावली


धूर्त नजरांस नजर भिडवुनी


इवलेसे ते पंख फडकावूनी


वीरांगना एकटी काकांसी भिडली


लढली अशी की ती जणू झुंजीतच वाढली


गलबला बहुत, समर चाले बहुत वेळ


उपवनात समराची जणू लाली वाढली


प्राणाहुनी प्रिय ती बाळे,


लढत राहावे मिटेपर्यंत डोळे


ऊर्जा तेथूनच तिने घेतली


चोच तलवार बनुनी चालू लागली


तगमग धडपड बघुनी साळुंकी धावली


विरांगनेसहित लढू लागली


धैर्य सामर्थ्य वाढता लढाई तुंबळ झाली


अन काकांच्या रुधीराने शांत झाली


लढली अशी की जणू झुंजीतच वाढली


पण पिल्ले वाचवली, पिल्ले वाचवली


Rate this content
Log in