STORYMIRROR

UMA PATIL

Thriller

2.5  

UMA PATIL

Thriller

26/11 शहिदांना श्रद्धांजली

26/11 शहिदांना श्रद्धांजली

1 min
23.8K


आतंकवादी ते भ्याड

हल्ले करती देशावर

गोळ्या झेलतो आम्ही

निधड्या, पोलादी छातीवर....


तो गनिम, आतंकवादी

आला २६ नोव्हेंबरला

गोळ्या झाडून निघाला

मुंबईच्या स्टेशनला....


चौकाचौकात दहशत

बंदुकीच्या गोळ्यांचा पूर

तरी न घाबरला इथे

भक्कम मुंबईकर....


अशोक कामटे, उन्नीकृष्णन

धन्य ते आपले वीर

देऊन त्यांचे धड

वाचवले भारताचे शीर....


विजय साळसकर, हेमंत करकरे

भारतमातेचे बलाढ्य पुत्र

झाले शहीद भारतासाठी

हेच अमरत्त्वाचे सूत्र....


शहीद तुकाराम ओंबाळे

आणि अजून कित्येक वीर

भारत एकच राहावा

जरी अंगाला पडली चीर....


शेवटी प्रत्येकाला इथे

द्यावाच लागतो हिसाब

सामना करू आतंकवाद्यांचा

जरी जन्मले किती कसाब....


ही 'उमा' पुण्यभावनेने

वाहते शहिदांना श्रद्धांजली

अखंड भारतमातेकडून

वीरपुत्रांना आदरांजली....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller