STORYMIRROR

Arun Bijwe

Thriller Children

4  

Arun Bijwe

Thriller Children

‼️खंत‼️✴️✴️✴️✴️

‼️खंत‼️✴️✴️✴️✴️

1 min
213

‼️हाती नाही जन्म जरी

   मृत्यू सर्वांचा निश्चित

   ज्याच्या त्याच्या हाती मात्र

   जगायचं सुनिश्चित. ‼️१‼️


‼️कसं जगावं जीवन 

   कालचक्रे निर्धारित

   बाल्य,तारुण्य,वृध्दत्व

   श्वास,अवस्था मुठीत. ‼️२‼️


‼️क्षण क्षण वेचतांना

   संपणार आयुष्य हे

   उत्तरार्धी आठवांचा

   पाठलाग करु पाहे. ‼️३‼️


‼️जमा भोवती गोताळा

   जणू वैष्णवांचा मेळा

   मैत्री सर्वांहून श्रेष्ठ

   लावी एकमेका लळा. ‼️४‼️


‼️बालपणी भेटलेले

   मित्र बहू अनमोल

   एकमेका लावी जीव

   नाही कुठे तोलमोल. ‼️५‼️


‼️वाटे मज बालपणी 

   मस्त पोहावे नदीत

   येत नव्हते पोहणे

   मित्र होते शिकवीत. ‼️६‼️


‼️केली एकदा हिंमत  

   उडी घेतली डोहात

   हलविले हात-पाय

   पाणी शिरले नाकात. ‼️७‼️


‼️बुडू लागता पाण्यात

   आले सोबती धावून

   सूर मारुनी खोलात

   मला काढले ओढून. ‼️८‼️


‼️घरी कळता प्रसंग

   मला मिळाला प्रसाद

   ताप भरला अंगात

   पार जिरला उन्माद. ‼️९‼️


‼️पुन्हा कधीच हिंमत

   झाली नाही आयुष्यात

   नाही शिकलो पोहणे

   खंत आजही मनात. ‼️१०‼️


Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller