Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

RohiniNalage Pawar

Thriller

4.5  

RohiniNalage Pawar

Thriller

कोविड-१९

कोविड-१९

1 min
12K


पापांचा घडा भरला म्हणावं की निसर्गाचा कोप म्हणावं,

'कोविड' तू का येऊन अशी रांगोळी घालत आहेस एवढंच समजावं...||१||


रस्त्याने मुग्यांसारखी फिरणारी माणसं आज चार भिंतीत आहेत,

आणि वनात फिरणारी जनावरं आज मोकाट रस्त्याने वावरत आहेत...||२||


काही ठिकाणी घरात बसून सगळं काही मिळतंय,

तर काही ठिकाणी पोट कसं भरावं याचा प्रश्न पडतोय...||३||


डॉक्टर तर देव होतेच पण आज साक्षात्कार होतोय,

कारण दगडातला देव सुद्धा आज कुलुपात बंद झालाय...||४||


का ?? हाहाकार घालतोयस तू कोविड,अजून किती अंत पाहणार आहेस,

माणसे आहोत रे आम्ही,असं मुग्यांसारखं का आम्हाला चिरडत आहेस...||५||


दररोज मावळणाऱ्या दिवसाबरोबर असं वाटतं तू पण मावळतोय,

पण उगवणारा सूर्य तुझे रूप उमलणाऱ्या फुलासारखे अजूनच उमलवतोय...||६||


तुझं किंवा मृत्यूचं भय नाही,पण त्यात आमचे जवळचे पण भरकटले जातात म्हणून भीती आहे...

नाहीतर तुझ्याशी झुंज द्यायला तर सगळा देश तयार आहे...||७||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller