STORYMIRROR

RohiniNalage Pawar

Others

3  

RohiniNalage Pawar

Others

आई आणि लेखणी

आई आणि लेखणी

1 min
255

आई झाले आणि लेखणी हातात घ्यायचीच विसरले,

वाटलं आता सुचणंच बंद झाले ,

पण फावल्या वेळात लेखणी उचलली आणि लिहिता लिहिता सुचू लागले...||१||


'त्रिशा'च करता करता दिवस कसा संपतो कळतच नाही,

आणि थंडीची रात्र मोठी असूनही कधी पहाट होते समजत नाही...||२||


'ती' हळूहळू मोठी होत आहे, शांत वाटणारी ती आता खेळकर होऊ लागली,

हसणं, रडणं,खेळणं तीच चालूच असतं, तीच ते वेळापत्रक आता मीही समजू लागले...||३||


पहिल्या सारखं सुचेल की नाही माहीत नाही

पण आता वाटतेय तिच्यावरही थोडंफार लिहीत राहील ...||४||


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍