STORYMIRROR

RohiniNalage Pawar

Others

4  

RohiniNalage Pawar

Others

लोणावळा आणि आम्ही तिघी

लोणावळा आणि आम्ही तिघी

1 min
115

लोणावळा आणि आम्ही तिघी

यावर मी काय लिहू,

अचानक सगळं ठरलं त्या

जगलेल्या दिवसाला शब्दांत कस बांधू...

स्टेशन ला उतरल्यावर वाटलं

आज पाऊस च नाही उगीच आलो,

थोडं पुढे जाऊन बुशी धरणाचा मार्ग धरला

गर्दी आणि पाणी च नाही म्हणत हिरमुसलो...

आलोच आहे तर फिरत फिरत

वरपर्यंत जाऊ म्हणून निघालो,

अर्ध्यात जातो ना जातो तोच

ढगांनी चहुबाजूने वेढलो गेलो....

समोर काहीच दिसत नव्हतं

वाट ही ओलसर झालेली,

हलकश्या सरींनी त्यात

बरसायला सुरूवात केलेली...

वर पोहचताच सरींनी ही स्वतःला

मुठीतून सोडवत हळूहळू वेग धरला,

पावसाला जवळून पाहण्याचा

तो क्षण डोळ्यांनी अलगद टिपला...

चिंब भिजवत पावसाने जणू

पर्यटकांचे स्वागतच केले,

धबधबे वाहू लागले नि

आम्हाला निसर्गाशी एकरूप केले...

भिजण्याचा मोहाने कधी

निसर्गाला अडवलं नाही,

आपण तर त्याचीच लेकरं

भिजायचा मोह सुटणारच नाही...

ओली धरती, चिंब भिजलेले रूप

वाहणारे धबधबे नि निशब्द स्वरूप,

सगळे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले

लोणावळ्याने तिघींना एकत्र आणले...

मस्ती मज्जा करून पुन्हा

परतीचा मार्ग तर धरला,

पण लोणावळा आणि आम्ही तिघी

प्रवास अजून ही नाही संपला....


Rate this content
Log in