अपूर्ण भेट
अपूर्ण भेट


खूप वर्षांच्या ओळखीत आपल्या
भेटी मात्र मोजक्याच झाल्या...
मोजक्या भेटीतही भेटी
का कुणास ठाऊक अपुऱ्याच राहिल्या...||१||
तुझी माझी साथ वाटते
मला खुप दूरवरची,
मग भेट पूर्ण का होत नाही
आपली दरवेळीची...||२||
वाट पाहतेय त्या क्षणाची
तू आणि मी असा भेटेल,
थेट असेल भेट ती
जी आपली भेट पूर्ण करेल...||३||
आज नाही तर नाही
उद्या तरी भेट पूर्ण होईल,
मनाची समजूत घालत
परत पुढची भेट आखून ठेवील...||४||