STORYMIRROR

Dr.ANIL SANGLE

Thriller

3  

Dr.ANIL SANGLE

Thriller

मला स्वप्न पडले

मला स्वप्न पडले

1 min
11.8K

मी माझ्या पत्नीची

निर्घुणपणे हत्या केली,

का तर भूक भागवण्यास

नेहमी टाळाटाळ केली


पाय कापले का तर

मला लाथा होती मारत,

हातसुद्धा तोडले का तर

नको असलेले होती चारत


तिच्या कारस्थानाने कलंक

लावला मानव जातीला,

घेण्या राख सामावून तिची

लाज वाटेल धरणीमातेला


रिमोट लपवायची कपटीने

हरवेळी करायची हटवाद,

मग मनाशीच ठरवलं आता

या राक्षसीला करू बरबाद


तिच्या वटारलेल्या डोळ्यात

जोरात खुपसला सुरा,

बुब्बुळ पडलं बाहेर मात्र

अजून बदला नाही पुरा


तिच्या नरडीवर पाय देऊन

मोडले कडकडा मुंडके,

तोंडात खुपसले विस्तवाचे

लालबुंद जळते दांडके


तिने दिलेलं दुःख आठवलं

मग चराचरा चिरला गळा,

तिच्या जीवन संघर्षाचा आता

बंद झाला होता टाळा


अक्षरशः ती माझ्या हातून

हालहाल करून मेली,

माझ्या उरात पेटलेली

सुडाची आग शांत झाली


सासर परिवार याचा अर्थ

तिला कधी समजलाच नाही,

फायदा घेते माहेर हा तिढा

तिला कधी उमजलाच नाही


मग अशा भोळसाट बिंडोक

येडीला भोसकने होते योग्य,

माझ्या मरणाआधी तिचे

मरण पाही हे माझे सद्भाग्य


मी किती दिवस राहणार

सारखा मनात झुरून,

फरपटत ओढली तिचे

लांबलचक केस धरून


हे कृत्य तिच्या घमेंडीच्या

तुलनेनं खरंच कमी होतं,

मग तिचा कोथळा काढला

रक्त चिळकांड्या मारत होतं


तिची घमेंड अन् गर्व मी

रक्तश्रूने सालोसाल सोसला,

मलाच म्हणायची सारखी

तुला माझ्या पैशावर पोसला


तिने केलेला अपमान मी

क्षणोक्षणी केला होता सहन,

नाईलाजाने प्रतिज्ञा घेई

माझ्याच हातून करील दहन


सुडाचा आगडोंब उग्ररूप   

माझ्या शरीराने केले धारण,

रोज मरून जगण्यापेक्षा

पत्करले मी फाशीचे मरण


घामाने ओलाचिंब होऊन

खडबडून झोपेतून जागा,

एड्जेस्टमेंट करणे कळले

संसार जन्मोजन्मीचा धागा


मित्रानो मला स्वप्न पडले

असे कुणालाच नये पडो,

सर्वांच्या जीवनात सदा

सुखानंदाचा संसार घडो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller