भयस्वप्न
भयस्वप्न
'आरं ए बेवड्या पतीराजा
नवरा नाही तू तर चांडाळ,
"धाब्यावर मुतारा पितो
आयुष्याचा पसारा गुंडाळ"
'नातलग जवळ करीना
तु इज्जत घातली आज,
"नग्न गटारात पडतो
तु सोडून दिलीस लाज,
'पैशासाठी मला मारण्याचे
कैक प्रयत्न तु केले,
"पण तु विचार केला का
दारूपाई स्मशानी गेले"
'आरे बेवड्या तुझ्या मुखी
मूतती पिसाळलेली कुत्रे,
"विसरलास सात फेरे अन्
सुखी संसाराची सुत्रे"
'जे उध्वस्त व्हायचं ते
झालं वाया गेली वर्ष,
"माझ्या व मुलाबाळांच्या
जीवनी उरला नाही हर्ष"
'तुझ्या औदसा मदिरेने
झाला सुखाचा प्रपंच भग्न,
"मधूर अमृत पाहिले स्वप्न
ध्येय कर्तुत्वाने व्हावे मग्न"
'माझे लग्नच का झाले हाच
आयुष्याचा मोठा पश्चाताप,
ng>"असंख्य दुःख घोर संकटं कर्ज याचे उरले नाही माप" 'तुझ्या लाथा बुक्याचा मार रक्ताळलेले लालबुंद वळ, "सहनशिलतेचा अंत झाला सोसणार नाही तुझा छळ" 'सडक्या थोबाडाला रोजच दारूचा अंबली घाण वास, "शेवटी मीच माझ्या नवऱ्याच्या गळ्यात अडकवला फास" 'निर्लज्ज चांडाळाची जीभ नरड्याच्या बाहेर पडली" "नवऱ्याने आत्महत्या केली बाहेर मी ढसाढसा रडली" 'माझीच सर्व बाजू घेती एकदाचा पंचनामा झाला, "नवऱ्याने आत्महत्याच केली कोर्टाचा निर्णय झाला" 'गाढ झोपेतून खडबडून उठले मला काही सुचेना, "पडलेले विचित्र भयस्वप्न खरोखरच मला पचेना" 'पलंगावर डाराडूर घोरताना दिसे निर्व्यसनी प्रिय पती" "मी ऐश्वर्यसंपन्न सुखात नांदे माझ्या संसारात सदैव गती"